अंकारा : देशात २०२२ मध्ये साखरेची कमतरता भासेल या वृत्ताचा तुर्कस्थानचे व्यापार मंत्री मेहमत मुस यांनी इन्कार केला. अंकारा येथे साखर उद्योगातील प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत मुस यांनी ही टिप्पणी केली. साखर उद्योगातील प्रतिनिधींनी सांगितले की, तुर्कस्थानमध्ये बीट आणि साखर उत्पादनाचा २०२० मध्ये नवा उच्चांक प्रस्थापित करण्यात आला होता. या कालावधीत १५० मिलियन डॉलरची निर्यात करण्यात आली. त्यांनी सांगितले की हवामान बदलामुळे २०२१ मध्ये बीट आणि साखरेच्या उत्पादनात घट झाली. तुर्कस्थानमध्ये साखरेची कमतरता भासल्यास या हंगामात पुन्हा सुरक्षा साठवणुकीचा वापर केला जाईल असे त्यांनी सांगितले.
जर साखर कारखाने तोट्यात साखर विक्री करत असतील तर त्यांचे नुकसान होईल असा इशारा साखर उद्योगातील प्रतिनिधींनी दिला. ते म्हणाले, अलिकडेच साखरेच्या कमी किमतीमुळे खासगी साखर कारखान्यांना नुकसान सोसावे लागत आहे. तुर्कीमध्ये २०२१-२२ मध्ये बिटचे उत्पादन १९.५ मिलियन मेट्रिक टन आणि लागण क्षेत्र ३,२०,००० हेक्टर असेल असा अंदाज आहे.