आयोध्या : मनकापूर साखर कारखान्यातून बिहारमध्ये पाठवण्यासाठी आणलेली 250 क्विंटल साखर ट्रकसोबत गायब झाली. तक्रार दाखल केल्यानंतर नगर कोतवाली पोलिसांनी ट्रकसहित दोघाजणांना ताब्यात घेतले, ताब्यात घेतलेल्या दोघांकडून 160 किलो साखर आणि विक्री केलेल्या साखरेचे 80 हजार रुपये जप्त केले. गोंडातील एका व्यापार्याला 1.70 लाख रुपयात साखरेची विक्री केल्याचे आरोपींनी कबूल केले.
एसपी विजयसिंह पाल म्हणाले, 19 सप्रटेबर ला मोहन ट्रान्सपोर्ट ने एका ट्रकच्या ड्रायव्हरला मनकापूर साखर कारखान्यातून 250 क्विंटल साखर बिहारमध्ये पाठवण्यासाठी बुक केले होते. पण ड्रायव्हर साखर घेवून बिहारपर्यंत पोहोचलाच नाही. एसआइ संजीव सिंह यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 10 वाजता नगर येथील अफीम कोठीजवळून ट्रक चालक जीवन मौर्या व दिलीप उर्फ पप्पी निवासी खिरंडी ठाणा वजीरगंज गोंडा यांना ताब्यात घेतले. एसपी म्हणाले, आरोपींची चौकशी सुरु आहे. आरोपींनी 90 क्विंटल साखर गोंडा येथील पकडी बाजार निवासी अशोक गुप्ता यांना 1.70 लाख रुपयांना विकली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.