नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील दोन जिल्ह्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस शेतीला प्रोत्साहन मिळाले आहे. यासाठी केलेल्या उपायांमुळे गेल्या दोन वर्षांत २९९ अब्ज लिटर पाण्याची बचत करण्यात यश मिळाले आहे अशी माहिती डीसीएम श्रीराम लिमिटेड कंपनीने दिली.
डीसीएम श्रीराम कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हरदोई आणि लखीमपूर खिरी या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या (आयआयएसआर) गोड सोने या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना पाण्याची बचत कशी करावी, वापर कमी कसा करता येईल याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
डीसीएम श्रीरामचे कार्यकारी संचालक आणि सीईओ रोशन लाल तमक यांनी सांगितले की, कंपनीकडून शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांचा अभ्यास आणि पाणी वापराच्या पद्धतीविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांनी २९९ अब्ज लिटर पाण्याची बचत केली आहे. उसाची शेती करताना पाण्याचा अधिक वापर होतो. अति पाण्याचा वापर ही समस्याही बनली आहे. आपल्याकडी नैसर्गिक संसाधनांचा वापर योग्य रितीने करणे महत्वाचे आहे. सुदैवाने आता उसाच्या शेतीसाठी पाण्याचा कमी वापर होईल यासाठी नवे तंत्रज्ञानही उपलब्ध झाले आहे. त्याचा वापर करण्यात आला आहे. पाचट कटिंग, मल्चिंग, कंपोस्टिंग, खोडवा कापणे आणि खंदक पद्धतीने लागवड अशा नव्या पद्धतींचा वापर केला गेला आहे. जवलपास २२५० गावांतील २ लाख २५ हजार ऊस उत्पादक शेतकरी या पाणी वापर पद्धतीच्या नव तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.