उसाचे पाचट जाळणाऱ्या दोन शेतकऱ्यांचा ऊस करार रद्द

बुलंदशहर : जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी त्यांना सूचना देऊनही पाचट जाळल्याप्रकरणी विभागाच्या वतीने त्यांचा ऊस नोंदणी करार (सट्टा) रद्द करण्यात आला आहे. आता हे शेतकरी संबंधित साखर कारखान्याला आपला ऊस विक्री करू शकणार नाहीत. विभागाच्यावतीने पिकाचे अवशेष जाळल्याप्रकरणी याआधीच सट्टा नोंदणी करार रद्द करण्याचा इशारा देण्यात आला होता. जिल्हा ऊस अधिकारी बृजेश पटेल यांनी सांगितले की, प्रशासन प्रदूषण रोखण्याविषयी गंभीर आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाचट जाळण्याचे प्रकार समोर येत आहे, त्या शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार, विभागाच्या वतीने शिकारपूर विभागातील जलालपूर गावातील शेतकरी ओमवीर आणि अरनिया विभागातील गाव बादशहापूर पंचगाई येथील शेतकऱ्याचा ऊस नोंदणी करार रद्द करण्यात आला आहे. आता हे दोन्ही शेतकरी आपला ऊस संबंधित कारखान्याला विक्री करू शकणार नाहीत. जर कोणत्याही शेतकऱ्याने पाचट जाळले, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. आतापर्यंत अशा प्रकाच्या २२ घटना आढळून आल्या आहेत. सॅटेलाइटद्वारे याची नोंद झाली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यावर ११ शेतकऱ्यांनी पिक अवशेष जाळल्याचे उघड झाले. सर्वांना प्रत्येकी २५०० रुपयांचा दंड आकारणी करण्यात आली आहे असे कृषी उपसंचालक डिपीन कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here