छत्रपती संभाजीनगर : चौंढाळा (ता. पैठण) येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात एक लाख मेट्रिक टन गाळप केले होते. या गाळपासाठी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद, कारखाना कर्मचारी, तोडणी वाहतूकदार यांचे मोलाचे योगदान मिळाले होते. या हंगामात दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. सन २०२४- २५ चा नवव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ गुरुवारी (ता. १४) पार पडला. कारखान्याचे व्हा. चेअरमन नंदू पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लताबाई दिलीप बोडखे, शोभाबाई लक्ष्मण डांगे यांच्या हस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रेणुकादेवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर, रोहिदास रेवडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव बावडकर, सहसंचालक भारत लांडगे, लक्ष्मण डांगे, विष्णू नवथर, भीमराव वाकडे, दिलीप बोडखे, सुभाष गोजरे, नाना गाभूड, ज्ञानदेव बडे, सरपंच भाऊसाहेब गोजरे, मुरलीधर सातपुते, पाराजी मोरे, अंकुश मतकर, गोविंद गोजरे, आबासाहेब गोजरे, मुख्य शेतकी अधिकारी धर्मराज काकडे, कार्यालयीन अधीक्षक श्रीमंत टेकाळे, खरेदी अधिकारी चंद्रकांत पाटील, चीफ केमिस्ट अशोक थोटे, चीफ इंजिनिअर राजेंद्र चौधरी, चीफ अकाउंटंट रमेश झिरपे, बॉयलर इनर प्रवीण गिरमे, अनिल दुबाले, हर्षद दुबाले, तोडणी वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते.