बेंगळूरूमध्ये HMPV विषाणूची लागण झालेले दोन रुग्ण आढळले

बेंगळूरू:चीनमध्ये उद्रेक झालेल्या मानवी मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) ची दोन प्रकरणे बेंगळुरूमध्ये आढळून आल्याने देशात खळबळ उडाली आहे.HMPV च्या पार्श्वभूमीवर देशात प्रचंड खबरदारी घेतली जात आहे. बेंगळूरूच्या रुग्णालयात दोन प्रकरणे आढळून आली असून रुग्णांनी कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचे रेकॉर्ड नाही.आठ महिन्यांच्या बाळावर बेंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कर्नाटकच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची पुष्टी केली आहे.

कोविड-19 प्रमाणेच मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) सर्व वयोगटातील लोकांमध्ये, विशेषत:लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या लोकांना होऊ शकतो.यामध्ये खोकला, नाक बंद होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे पाहायला मिळतात. काही प्रकरणांमध्ये, न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस देखील विकसित होऊ शकतात. तथापि, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या फ्लूचा हंगाम लक्षात घेता परिस्थिती असामान्य नाही.अहवालात असेही म्हटले आहे की सध्याची वाढ इन्फ्लूएंझा विषाणू, RSV आणि HMPV मुळे होत आहे.सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here