दोन टप्प्याच्या एफआरपीला शेतकरी संघटनेचा विरोध

कोल्हापूर, दि. 7 स्पटेंबर 2018 : साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे गुजरातच्याधर्तीवर दोन ते तीन टप्प्यात एफआरपीची रक्कम देण्यास परवानगी मागितली आहे. याला विरोध करण्यासाठी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारने याला मंजूरी देवून नये यासाठीही कोल्हापूरात ऊस उत्पादकांची मेळावा घेणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी एका निवेदनद्वारे कळवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना 2018-19 मध्ये दोन टप्प्यात एफआरपी द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच, कारखान्यांकडे पैसे असो किंवा नसोत एफआरपी देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत येत असल्याचे महासंघाने म्हटले आहे. दरम्यान महासंघाच्या या निर्णयामुळे शेतकरी अडचणीत येणार आहेत. सध्या एफआरपीची रक्कम एकाचवेळी देण्याचा कायदा असतानाही दोन ते तीन टप्प्यात दिली जात आहे. केंद्राने परत दोन हप्त्यात देण्यास परवानगी दिली तर मात्र शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळणार नाहीत. अशी परिस्थिती आहे. यासाठी रघुनाथदादा पाटील लवकरच ऊस परिषद घेणार असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here