पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगामाने आता जोर धरला आहे. मात्र, विभागनिहाय स्थिती वेगळी असल्याचे दिसले. सोलापूर विभागातील दोन साखर कारखाने बंद झाले आहेत.
महाराष्ट्रात सोलापूर विभागात १५ फेब्रुवारीअखेर, सर्वाधिक ४१ साखर कारखाने सुरू होते. कोल्हापूर विभागामध्ये ३७ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. सोलापूर विभागातील दोन कारखाने बंद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रामध्ये मोठ्या संखयेने साखर कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १५ फेब्रुवारी २०२१ अखेर १८५ साखर कारखान्यांनी गाळप केले. राज्यात ७४३.३३ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७५४,६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा साखर उतारा सरासरी १०.१५ वर पोहोचला आहे.