युएइचा वार्षिक साखरेचा वापर पोहोचला २५०,००० टनांवर

अबू धाबी: अल खलीज शुगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जमाल अल घूरैर यांनी सांगितले की, २०२२ च्या शेवटच्या तिमाहीत युएइमधील साखरेची मागणी ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. देशांतर्गत साखरेचा वापर सुमारे २५०,००० टन इतका होण्याची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले. दुबई शुगर समिट २०२३ च्या ७ व्या परिषदेत साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि भागधारकांनी या क्षेत्रासमोरील संधी आणि आव्हानांवर चर्चा केली. अल घुरेर म्हणाले, यूएई आपल्या कच्च्या साखरेपैकी ९५ टक्के साखर ब्राझीलमधून आयात करतो. यूएई भारतातून केवळ ५ टक्के शुद्ध साखर आयात करते.

उद्योगासमोरील सध्याच्या आव्हानांबाबत अल घुरैर म्हणाले, स्थानिक बाजारपेठेत भारताकडून साखर डंपिंग हे सध्या यूएईतील उद्योगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भारत आपल्या उद्योगाला पाठिंबा देत आहे, तर साखर निर्यातदारांना युएईची बाजारपेठ फायदेशीर वाटते. अल घुरैर यांनी संयुक्त अरब अमिरातमधील उत्पादनांवर संरक्षणात्मक शुल्क लादणाऱ्या देशांशी समान वागणूक देण्याचे आवाहन केले आहे, विशेषत: युरोपमधील काही देश जे युएईच्या साखरेवर ४०० युरो प्रती टनपर्यंत शुल्क आकारतात.

ते पुढे म्हणाले की अल-खलीज शुगर, जगातील सर्वात मोठी स्वतंत्र साखर रिफायनरी असून, सध्या भारतामुळे वार्षिक सुमारे १.५ दशलक्ष टन उत्पादन क्षमतेच्या केवळ ४० टक्के क्षमतेसह सुरू आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, जास्त मागणी आणि कमी पुरवठा यामुळे जागतिक साखरेच्या किमती सुमारे ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here