जकार्ता: इंडोनेशियाच्या कृषी मंत्रालयाचे महासचिव कसदी सुबाग्योनो यांनी सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) इंडोनेशीयातील साखर उद्योगात खास गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आमच्याकडे संयुक्त अरब अमिरातीचा गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे. यामध्ये ते ऊस शेती, साखर उद्योग आणि त्याच्याशी संलग्न व्यवसायांमध्ये आपली गुंतवणूक करू इच्छितात. गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, त्यांन आकर्षित करणे आणि कृषी क्षेत्रात व्यवसाय व्यवस्थापनासाठी संधी निर्माण करून त्याला बळ देण्याची भूमिका कृषी मंत्रालयाची आहे असे महासचिव सुबाग्योनो यांनी सांगितले.
सुबाग्योनो यांनी सांगितले की, आमचे प्राथमिक उद्दिष्ट निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे आहे. आम्ही अधिकाधिक गुंतवणूक करणाऱ्यांना निमंत्रित करीत आहोत. सरकार देशांतर्गत गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देत आहे. सुबाग्योनो यांनी सांगितले की, केंद्रीय सांख्यिकी एजन्सीच्या (बीपीएस) आकडेवारीनुसार, कृषी क्षेत्राने २०२०च्या दुसऱ्या तिमाहीत १६.२४ टक्के वाढ नोंदवली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link