सांगली : बामणी- पारे येथील उदगिरी साखर कारखाना प्रती दिन ५ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार असून इथेनॉल प्रकल्पाची क्षमता दीड लाख लिटर केली आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी केले. कारखान्याच्या १२ व्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन माजी आमदार मोहनराव कदम यांच्या हस्ते व संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी सांगितले की, कारखान्यात ऊस गाळप केल्यानंतर रसातील पाणी बाजूला काढून पुनर्वापर करण्यात येणार असल्याने दैनंदिन पाणी वापर कमी होणार आहे. यावेळी निवास पवार व त्यांच्या पत्नी यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. प्रल्हाद पाटील, उत्तम पाटील, जे. के. जाधव, आबासाहेब चव्हाण, दिलीप पाटील, डी. एम. माने यांसह सर्व संचालक, खाते प्रमुख, कर्मचारी व उपस्थित होते.