सांगली : उदगिरी शुगर ॲन्ड पॉवर साखर करखान्यास साखर उद्योगातील आघाडीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म ‘चिनीमंडी’द्वारे दोन दिवसीय जागतिक शुगर ॲन्ड इथेनॉल कॉन्फरन्समध्ये बेस्ट एन्व्हायन्मेंट फ्रेंडली शुगर मील पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील अंदाज – ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुलदादा कदम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
डॉ. शिवाजीराव कदम यांनी उभारलेला उदगिरी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील एक आघाडीचा साखर कारखाना आहे. कारखान्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत. बेस्ट एन्व्हायन्मेंट फ्रेंडली शुगर मील पुरस्कारासाठी निवड करताना कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणाची हानी होवू नये याकरिता वापरलेले तंत्रज्ञान, त्याचप्रमाणे कारखाना परिसरामध्ये केलेली वैविध्यपूर्ण वृक्षलागवड आदी सर्व बाबींचा समावेश केला आहे. या सर्वात उदगिरी साखर कारखाना अव्वल असल्याची माहिती ‘चिनीमंडी’चे सहसंस्थापक हेमंत शहा यांनी दिली. या पुरस्कारामुळे कारखान्याच्या लौकीकात भर पडलेली आहे, असे कारखान्याचे चेअरमन डॉ. राहुल कदम यांनी सांगीतले.