मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थिक स्थितीच्या परीक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी प्रमुख मंत्र्यांबरोबर बैठक आयोजित केली आहे. राज्यातील अर्थव्यवस्थेच्या पुनरुद्धारासाठी करण्यात येणार्या उपायांवर मंत्री या बैठकीत विचार करतील. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी राज्यासाठी पोेस्ट लॉकडाउन आर्थिक पुनरुद्धार योजना यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुद्धार योजनेची सूचना देण्यासाठी एका तज्ञ पॅनेलचे गठन केले होते. लॉकडाउन नंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुद्धारासाठी तज्ञ पॅनेलचा अहवाल कॅबिनेट सब कमिटी चे प्रमुख यांनी डेप्युटी सीएम अजीत पवार यांच्याकडे सुपुर्द केला आहे.
आजच्या बैठक़ीत तज्ञ पॅनेलच्या रिपोर्टच्या सूचनांवर चर्चा होईल. अर्थव्यवस्थेच्या पुनरुद्धारासाठी मंत्रीमंडळाच्या उपसमितीचा भाग असणारे मंत्री विडियो कॉन्फरसिंग च्या माध्यमातून या बैठक़ीत सहभाग घेणार आहे. कोविड 19 मुळे महाराष्ट्रावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.