पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी करणार आहेत. गुरुवारी दुपारी इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या भीषण आगीत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने इन्स्टिट्यूटच्या पाहणीचा निर्णय घेतला.
पुण्यानजीक मांजरी येथे सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लान्टमध्ये लस बनविली जाते. येथे गुरुवारी भीषण आग लागली. यामध्ये ५ कामगारांचा मृत्यू झाला होता. आग लागल्याने झालेल्या नुकसानीची अद्याप माहिती मिळालेली नाही. सोबतच आगीचे कारणही अस्पष्ट आहे. आगीत कोरोना व्हॅक्सिनला कोणताही धक्का पोहोचलेला नाही. नव्या प्लान्टमध्ये आग लागली होती. जेथे अद्याप लस बनविण्यास सुरुवात झालेली नाही. कंपनीच्या एक नंबर गेटजवळील इमारतीत आग लागली होती. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी औषध कंपनी आहे. सीरमतर्फे दररोज १.५ अब्ज डोस विक्रीस पाठवले जातात. कंपनीची स्थापना १९६६ मध्या सायरस पुनावाला यांनी केली होती.