उदगिरी कारखान्याचे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : उत्तम पाटील

सांगली:बामणी- पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे.या गळीत हंगामात ७ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती कारखान्याचे पूर्ण वेळ संचालक उत्तम पाटील यांनी दिली.बामणी- पारे येथील उदगिरी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

संचालक उत्तम पाटील म्हणाले की, कारखान्यातील सर्व कामे वेळेत पूर्ण करून येणारा गळीत हंगाम वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे.सध्या ऊस तोडणी व वाहतुकीचे करार सुरू आहेत.आतापर्यंत १५ ट्रक, ३३५ ट्रॅक्टर, ४०० अंगद व १५ हार्वेस्टरशी करार झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मुख्य अभियंता जितेंद्र मेटकरी, निवास पवार, आर.आर.चव्हाण, कुलदीप पांढरे, जितेंद्र जाधव, बशीर संदे, रणजीत चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here