‘उदगिरी शुगर’चे प्रतिटन ३१०० प्रमाणे गाळप उसाचे बिल शेतकऱ्यांना अदा : अध्यक्ष डॉ. राहुल कदम

सांगली : बामणी-पारे (ता. खानापूर) येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लि. च्या गळीत हंगामासाठी आलेल्या उसास प्रतिटन ३१०० रुपये एकरकमी बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचे अध्यक्ष डॉ. राहुल कदम यांनी सांगितले. डॉ. राहुल कदम म्हणाले, “हंगाम २०२४ २५ मधील १५ डिसेंबर २०२४ पर्यंत १ लाख ६१ हजार ६५८ टन गाळप केलेल्या उसाचे ५० कोटी ११ लाख रुपये ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे.

संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, मागील वर्षीच्या हंगामापर्यंत कारखान्याने उत्तम गाळप केले आहे. गाळपास आलेल्या उसाची सर्व रकम वेळच्या वेळी शेतकऱ्यांना एकरकमी दिली. तोडणी वाहतूक यंत्रणेचीही रकम देण्यात आली. शेतकरी, तोडणी-वाहतूक यंत्रणा व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. तांत्रिक, आर्थिक व्यवस्थापन, पर्यावरणाबाबत विविध पुरस्कार प्राप्त झालेत. सध्या ५ हजार टन गाळप क्षमता, १४ मेगावॉट को जनरेशन व दीड लाख लिटर्स क्षमतेची डिस्टिलरी कार्यान्वित आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘सीएसआर’ निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले, गरजवंतांना मदत केली आहे. आवश्यक तोडणी-वाहतूक यंत्रणा असून नियोजनही चांगले आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. आर्थिक उलाढाल वाढून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here