उदगिरी शुगर्सचा ‘सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लांट’ पुरस्काराने सन्मान

 पुणे : को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे उदगिरी शुगर अँड पॉवर लि. साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास खासगी साखर कारखाना विभागामध्ये ‘सर्वोत्कृष्ट को-जनरेशन पॉवर प्लांट’ पुरस्कार ‘को-जन इंडिया’चे संस्थापक, खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ‘उदगिरी शुगर’चे संस्थापक, चेअरमन डॉ. शिवाजीराव कदम आणि चेअरमन व एमडी डॉ. राहुलदादा कदम यांनी कारखान्याच्या टीमसह स्वीकारला.

यावेळी को-जन इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिनेश जगदाळे, नरेंद्र मोहन, सुभाष कुमार व जनरल मॅनेजर संजय खताळ आदी उपस्थित होते. व्यासपीठावर राज्य सह‌कारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ऑइल अॅड नॅचरल गॅस कॉपोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुभाष कुमार, डी. डी. जगदाळे, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे, हायड्रोजन असोसिएशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. एस. एस. व्ही. रामकुमार आणि रेणुका शुगर्सचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत उदगिरी शुगर कारखान्याला विविध राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here