इगंगा : जिल्ह्यातील नैकलामा उप विभागातील बकुना गावात सुमारे सत्तर एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या शेताशेजारील एका बागेमधून आग पसरल्याचा संशय शेताचे मालक एड्रिसा कलोंगेट मिस्वा यांनी व्यक्त केला.
आग लागून ऊसाचे नुकसान झाल्याने शेतमालक एड्रिसा धास्तावले आहेत. येथील सर्व साखर कारखान्यांनी जळालेला ऊस स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे या उसाचे काय करायचे याचा प्रश्न आमच्यासमोर आहे असे एड्रिसा यांनी सांगितले.
एड्रिसा म्हणाले, अचानक लागलेल्या या आगीत सुमारे ३५०० टन ऊस जळून नष्ट झाला. त्यामुळे सुमारे ३०० मिलियनचे नुकसान झाले आहे. दुपारी एकच्या आसपास आग लागली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. नाकामामा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मायकल अरिंडा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने शेतमालक आणि स्थानिकांचे आगीबाबतचे जबाब नोंदवले आहेत. आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.