कंपाला : युगांडाने लष्करी अळी (टिड्डी) किटकांपासून लढण्यासाठी सैनिक तैनातकेल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. लष्करी अळीने आतापर्यंत युगांडातील १३,००० एकरातील पिके नष्ट केली आहेत. पंतप्रधान रोबिना नब्बांजा यांनी संसदेत सांगितले की, सरकारने याच्या देखरेखीस मदत करण्यासाठी आणि किटक नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी निरीक्षकांना पाठवले आहे. तसेच या अळीला रोखण्यासाठी १००० सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अळीच्या हल्ल्यात मक्का, बाजरी, ज्वारी, गहू, ऊस या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
सरकारने सांगितले की, लष्करी अळीचा फैलाव (आर्मीवॉर्म) ४० हून अधिक जिल्ह्यात झाला आहे. या किडीचा फैलाव झालेल्या जिल्ह्यातील लोकांच्या दैनंदिन जीवनातही धोका उत्पन्न झाला आहे. कृषी मंत्री ब्राइट रवामीरामा यांनी सांगितले की, यापूर्वी मार्च महिन्यात या किडीच्या आक्रमणाची माहिती मिळाली होती. आणि आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत जवळपास १४०७ शेतकरी या विनशकारी किडीच्या तडाख्यात सापडले आहेत. कोरडे हवामान आणि पावसाला होणारा उशीर यामुळे किडीचा फैलाव गतीने होत आहे. देशात जवळपास ७० टक्के भाग कृषी क्षेत्रात सहभागी आहे. ते आर्थिक विकासाचे केंद्र असून जीडीपीमध्ये त्याचे योगदान २२ टक्के इतके आहे.