कंपाला : अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे बुसोगा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्तर युगांडामधील एतिक साखर कारखान्याला ऊस पाठवणे मुश्कील होतं आहे.
डिसेंबर २०२० मध्ये ग्रेटर बुसोगा शेतकरी युनीयनसोबत सहा महिने दररोज १५०० टन ऊस पाठविण्याचा करार एतिक साखर कारखान्यासोबत करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारने ऊस वाहतूकीला सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ११ जानेवारी २०२१ रोजी बुसोगा डायोसेक पॉल मुसा नॅमनहयेच्या बिशपनी उसाच्या ५० ट्रकना हिरवा झेंडा दाखवला होता.
मात्र आता ग्रेटर बुसोगा ऊस उत्पादक शेतकरी युनियनचे अध्यक्ष गॉडफ्रे बिरीवली यांच्या म्हणण्यानुसार, आमच्याकडे जादा ऊस आहे. मात्र एतिकपर्यंत ऊस वाहतूक करू शकणारी वाहने नाहीत. कमी इंधनात २० टन अथवा त्यापेक्षा अधिक ऊस नेणाऱ्या ट्रेलर्सची गरज आहे. वाहतुकीला उशीर होत असल्याने ऊस वाळत असल्याची अडचण आहे. आम्ही कंपन्यांकडून मोठे ट्रक मागवतो. मात्र कधी कधी कंपन्या आपली वाहने सुदानला पाठवतात असे बिरीवली यांनी सांगितले.