कंपाला : युगांडाकडून केनियाला होणाऱ्या साखर निर्यातीत गतीने वाढ होत आहे. युगाडातील साखर निर्यातदारांना पुढील आठवड्यात केनियाकडून आणखी एक २०००० मेट्रिक टन साखर निर्यातीस परवानगी मिळणार आहे. युगांडाचे व्यापार मंत्री अमेलिया क्युमबडे यांनी सांगितले की दोन सरकारांमध्ये झालेल्या ९०००० मेट्रिक टन साखर पुरवठयाच्या करारातील हा एक हिस्सा आहे. केनियाने काही अटींवर युगांडाला दरवर्षी ९०००० टन शुल्क मुक्त साखर निर्यातीची अनुमती दिली आहे.
मंत्री क्युमबडे म्हणाले, नियोजनबद्थ पद्धतीने निर्यात सुरू राहील. २०२० मध्ये वाढत्या साखर साठ्यामुळे केनियाने सर्व साखर आयातीवर निर्बंध लावल्याची घोषणा करत सर्व साखर आयातदारांचे परवाने रद्द केले. साखर डंपिगमुळे केनियातील उत्पादकांच्या विक्रीवर नकारात्मक परिणाम होत होता. त्यामुळे टांझानिया आणि रवांडाने सर्वात आधी युगांडाची साखर बंद केली. त्यानंतर डिलर आपल्या बाजारपेठेत स्वस्त साखर आयात करून निर्यात करीत असल्याचा आरोप केनियाने केला. त्यामुळे युगांडाच्या साखरेवर सहजपणे नियंत्रण आणि मूल्यांकनासाठी सीमेवर गोदामांचा प्रस्ताव देण्यात आला होता.