कम्पाला : युगांडाने आपल्या शेजारचा देश टांझानियाला साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे, यामध्ये 20,000 टनाच्या पहिल्या टप्प्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. युगांडामध्ये अतिरिक्त साखरेची मोठी समस्या आहे, आणि युगांडा सरकार साखरेच्या विक्रीसाठी नव्या बाजाराच्या शोधात आहे. मे 2020 अखेरपर्यंत साखरेचा पहिला टप्पा टांझानियाला निर्यात केला जाईल.
हा पहिला टप्पा आहे, ज्याने युगांडा च्या साखर कारखान्यांसाठी बाजाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी सोमवारी टांझानियाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, जी कैगिन शुगर लिमिटेड चे प्रमुख निदेशक सीफ़ एली सीफ यांच्या अध्यतेखाली झाली. मुसेवेनी यांनी युगांडा तून साखरेची आयात करण्याच्या परवानगीसाठी आपल्या टांझानिया समकक्ष चॉन मैगुफुली यांचे आभार मानले.
युगांडाचे व्यापार मंत्री अमेंलिया कामाबडे यांनी बैठक़ीत सांगितले की, हा सौदा युगांडातील बर्याच वेळेपासून टांझानियाच्या बाजारामध्ये साखरेच्या विक्रीसाठी संधी शोधणार्या कारखानदारांसाठी दिलासादायक आहे. मंत्री कामाबडे म्हणाले, युगांडामध्ये 48,000 टन अतिरिक्त साखर आहे, जिला टांझानियाच्या सध्याच्या साखरेच्या कमीला दूर करण्यासाठी निर्यात केले जावू शकते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.