कंपाला : मसिंदी जिल्ह्यात $१५ मिलियनची गुंतवणूक करून तयार करण्यात आलेल्या किन्यारा औद्योगिक व्हाइट शुगर रिफायनरी प्लांटचे उद्घाटन राष्ट्रपती योवेरी कागुटा मुसेवेनी यांच्या हस्ते झाले. या प्लांटमध्ये ६०,००० मेट्रिक टन औद्योगिक व्हाइट शुगरचे उत्पादन होईल. तर कच्च्या मालाच्या रुपात ७०,००० मेट्रिक टन ब्राउन शुगरची गरज असेल.
राष्ट्रपती योवेरी कागुटा मुसेवेनी म्हणाले, उत्पादन वाढल्यानंतर युगांडाच्या प्रक्रिया केलेल्या साखरेची विक्री देशांतर्गत आणि पूर्व आफ्रिकेतील बाजारात विक्री होईल. औद्योगिक साखरेची जवळपास १,५०,००० मेट्रिक टनाची मागणी आहे. मुसेवेनी यांनी सांगितले की, मी आपली औद्योगिक साखर खरेदी केली जावी यासाठी पूर्व आफ्रिकेतील देशांची चर्चा करेन. आम्ही आयात केल्या जाणाऱ्या औद्योगिक साखरेवर लवकरात लवकर कर आकारणी करू.
राष्ट्रपती मुसेवेनी यांनी युगांडातील लोकांना त्यांच्या अतिरिक्त उत्पादीत साखरेस बाजारपेठ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, आमचे पूर्व आफ्रिकेतील मित्रही या साखरेची खरेदी करू शकतात. त्यांचा तोटा आमच्या अतिरिक्त साखर साठ्यापेक्षा जास्त आहे. औद्योगिक साखर शितपेय निर्माता, बेकरी, कन्फेक्शनरी, फार्मास्युटिकल्स आदींसाठी उपयुक्त ठरते.