इंडोनेशिया: ऑगस्टपर्यंत साखर उत्पादन 540,000 टनापर्यंत पोचण्याची शक्यता

जकार्ता : कृषी मंत्रालयानुसार, इंडोनेशिया मध्ये साखर उत्पादन आपल्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहे आणि ऑगस्टपर्यंत 540,000 टनापर्यंत पोचण्याची शक्यता आहे. मंत्रालयाच्या प्लांटेशन चे महानिदेशक कासदी सुबाग्योनो म्हणाले की, जून जुलै मध्ये साखरेचे उत्पादन 430,000 पासून 530,000 टन आणि ऑगस्टपर्यंत वाढून 540,000 टनापर्यंत पोचण्याची शक्यता आहे. सप्ेटंबर नंतर उत्पादन कमी होणे सुरु होईल.

सबग्योनो यांच्या नुसार, मार्च आणि मे च्या दरम्यान, घरगुती साखर उत्पादनाने कीमतींमध्ये वाढ करण्यासाठी प्रेरीत केले होते. ते म्हणाले की, साखरेचे उत्पादन आता आपल्या अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे, आणि साखरेच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाने मे जून मध्ये साखरेच्या किमंतींमध्ये घट नोंदवली आहे. साखरेच्या किंमती सीलिंग प्राइजच्या वर राहिल्या. कृषी मंत्रालयाने आपल्या खाद्य सुरक्षा एजन्सी च्या माध्यमातून साखरेचे मूल्य स्थिर करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here