बेळगाव : उगार शुगर वर्क्स लिमिटेडने हंगाम २०२२-२३ साठी ऊस गाळप सुरू केल्याची घोषणा केली आहे. भारतीय शेअर बाजाराच्या नियामक फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, उगार युनिटने हंगाम २०२२-२३ साठी उसाचे गाळप १७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झाले आहे. कंपनीने सांगितले की, लवकरच पूर्ण क्षमतेनुसार गाळप केले जाईल.
देशातील अनेक राज्यांमध्ये साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. उसाचा रस, सिरप, मोलॅसीसला इथेनॉलमध्ये रुपांतरीत करण्यासाठी साखर उत्पादनात ४५ लाख टनाची घट लक्षात घेऊन ISMA ने २०२२-२३ या हंगामात जवळपास ३६५ लाख टन साखर उत्पादन होईल असे अनुमान वर्तवले आहे.