युक्रेनमध्ये साखर टंचाई भासणार नाही : Ukrainian Agribusiness Club

किव : युक्रेनने यंदा, २०२१-२२ या व्यावसायिक वर्षात १.४ मिलियन टन साखर उत्पादन केले आहे. त्यापासून १.२ मिलियन टनाची देशांतर्गत मागणी सहज पूर्ण होऊ शकते असे Ukrainian Agribusiness Club (UAC) ने म्हटले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा अधिक उत्पादनातून साखर टंचाईची समस्या दूर झाली आहे. २०२१-२२ मध्ये उत्पादित झालेली साखर गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त आहे. उत्पादित साखर युक्रेनची वार्षिक गरज भागविण्यास पुरेशी आहे. रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे युक्रेनमधून मोठ्या प्रमाणावर लोकांनी परदेशात स्थलांतर केले आहे. त्यामुळे साखरेच्या खपातही घसरण झाली आहे.

युक्रेनमध्ये २ जूनपर्यंत जवळपास १,८१,००० हेक्टरवर बीटची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड गेल्या वर्षीच्या लागवड क्षेत्राच्या ८० टक्के आहे. UAC ने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनवर रशियाच्या सैन्याने केलेल्या आक्रमणानंतर जीवनावश्यक खाद्यपदार्थ्यांच्या वस्तूंच्या मागणीत तेजी आली आहे. प्रत्येक कुटूंबाने जेवणाची टंचाई आणि संभाव्य किंमत वाढीच्या भीतीमुळे एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी अन्नधान्य साठा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अनेक देशांनी आपली गरज भागविण्यासाठी साखरेवर निर्यात निर्बंध जारी केले आहेत. मे २०२२ मध्ये भारत, कझाकिस्तान, किर्गीझस्तानने आणि त्याआधी एप्रिलमध्ये बेलारुसकडून, मार्च महिन्यात रशियाने याच्या निर्यातीवर प्रतिबंध लागू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here