युक्रेनचा २०२४ मध्ये साखर निर्यातीचा नवा विक्रम

कीव : नॅशनल युनियन ऑफ शुगर प्रोड्युसर्स ऑफ युक्रेन (उक्रत्सुकोर) ने जारी केलेल्या अहवालानुसार, २०२४ मध्ये, युक्रेनियन साखर उत्पादकांनी साखर निर्यातीचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या वर्षात ४१९ दशलक्ष डॉलर किमतीचे ७४६.३ हजार टन उत्पादन परदेशी बाजारात निर्यात केले. युक्रेनच्या साखर उत्पादकांच्या राष्ट्रीय संघटनेची स्थापना झाल्यापासून, १९९७ पासूनच्या आकडेवारीनुसार एका वर्षात साखर निर्यातीचा हा सर्वाधिक आकडा असल्याचे Ukrtsukor ने म्हटले आहे उक्रत्सुकरच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये युरोपिय संघाला ४० टक्के निर्यात करण्यात आली होती. आणि ६० टक्के पुरवठा जागतिक बाजारपेठेत होता, जेथे युक्रेनियन साखरेचे मुख्य खरेदीदार MENA (मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका) आणि उत्तर मॅसेडोनिया होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here