हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
किव्ह (युक्रेन) : चीनी मंडी
युक्रेनमध्ये पुढील हंगामासाठी बीट लागवडीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात २७ हजार हेक्टर क्षेत्रात बीट लागवड करण्यात आल्याची माहिती युक्रेनच्या कृषी मंत्रालयाने दिली आहे.
तत्पूर्वी, यंदाच्या हंगामात बीट लागवडीचे क्षेत्र ५ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता. यंदा २ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रात बीट लागवडीची शक्यता आहे. युक्रेनच्या युक्तरत्सुकोर या साखर उत्पादकांच्या असोसिएशनच्या म्हणण्यानुसार बीटाचे क्षेत्र यंदा २ लाख ३० हजार हेक्टर किंवा त्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे.
युक्रेनमध्ये बीट पासून मोठ्या प्रमाणावर साखर तयार केली जाते. २०१८-१९ च्या हंगामात युक्रेनमध्ये १३६ लाख टन बीटपासून १८२ लाख टन शुद्ध प्रक्रियायुक्त साखर तयार करण्यात आली होती. आता पुढील हंगामात युक्रेनमध्ये किती बीट उत्पादन होते आणि त्याच्या साह्याने किती साखर तयार होणार, याची उत्सुकता आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp