केव (युक्रेन) : चीनी मंडी
आंतरराष्ट्रीय साखर बाजारात युक्रेन यावर्षी (२०१८-१९) निर्यात वाढविण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या नॅशनल शुगर प्रोड्युसर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार युक्रेनमध्ये साखरेचे उत्पादन ५.५ टक्क्यांनी कमी करण्यात येईल आणि निर्यात १३ टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे.
याबाबत सुकडेन ग्रुप ऑफ कंपनीजच्या (सीआयएस) मरिना सिडेक यांनी सांगितले की, यंदच्या २०१८-१९च्या हंगामात युक्रेन आणि रशियातील साखर उत्पादनात अनुक्रमे ५.५ आणि ११ टक्के घट दिसणार आहे. त्याचवेळी बेलारूसमध्ये साखरेचे उत्पादन १३ टक्क्यांनी वाढणार आहे. उत्पादन कमी होत असले तरी युक्रेन आणि रशियातून साखरेची निर्यात वाढणार आहे. युक्रेन १३ तर रशिया ७ टक्क्यांनी निर्यात वाढवेल. बेलारूसमधून मात्र निर्यात ५ टक्के निर्यात घटणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर विक्रीसाठी स्पर्धा वाढणारच आहे.
सिडेक म्हणाल्या, ‘युक्रेनमध्ये असलेल्या अंतर्गत परिस्थितीमुळे तेथील स्थानिक बाजारातील साखरेची मागणी कमी होणार आहे. युक्रेनच्या रेल्वेकडे साखर झाकून नेणाऱ्या बोगींची संख्या कमी असल्यामुळे साखरेच्या वाहतुकीचाही मोठा पेच निर्माण झाला आहे.’