हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
युक्रेनियन उत्पादकांनी मे 2019 मध्ये 40,000 टन साखर निर्यात केली, जी एप्रिलच्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे.
युक्रेनच्या साखर उत्पादकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या मते, युक्रेनियन उत्पादकांनी चालू विपणन वर्षात 41,300 टन साखर निर्यात केली आहे, जी एप्रिलच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे
मे मध्ये युक्रेनियन साखरेचा मुख्य आयातक अझरबैजान हे होते त्याचबरोबर तुर्की, ताजिकिस्तानला पण मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात केली गेली.
सन 2018-2019 हंगामादरम्यान सप्टेंबर ते मे या कालावधीत 378,200 टन साखर निर्यात करण्यात आली होती, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी कमी आहे.
अहवालानुसार 2018 च्या अखेरीस युक्रेनने 217 मिलियन डॉलर्स पर्यंत साखर निर्यात केली होती.