युक्रेन : युक्रेनच्या साखर उद्योगाचे सर्वेक्षण करुन तयार केलेल्या अहवालानुसार, युक्रेनच्या साखर निर्यातीमध्ये 2018-19 या हंगामात घट झाल्याचे दिसून आले आहे. 2018-19 या वर्षातील 11 महिन्यांमध्ये देशात साखरेच्या निर्यातीमध्ये पूर्वीच्या हंगामाच्या तुलनेत 24 टक्के घट झाली असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
यावर्षी देशात साखरेचे उत्पादन 1.1 ते 1.2 मिलियन टन इतके होईल, असा अंदाज साखर उत्पादक संघाने व्यक्त केला होता. यामुळे युक्रेन च्या बाजारात साखर कमी होवू शकते. युक्रेनमधील साखर बीटची तोडणी आणि अतिवृष्टीमुळे मातीचा वरचा भाग आणि ढगाळ वातावरण राहिल्याचा 2019 मधील साखर उत्पादनावर परिणाम होवू शकतो.
मे मध्ये, देशात साखरेची निर्यात वाढ झाली होती. युक्रेनच्या उत्पादकांनी 40,000 टन पेक्षाही अधिक साखरेची निर्याती केली आहे, ज्याचे प्रमाण एप्रिलच्या तुलनेत 30 टक्के अधिक आहे. खासकरुन युक्रेन तजाकिस्तान, अजरबैजान, उज्बेकिस्तान, किर्गिस्तान या देशांना साखर निर्यात करतो. अहवालानुसार, 2018 अखेर, युक्रेन ने 217 मिलियन डॉलर पर्यंत साखरेची निर्यात केली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.