बागपत ऊस समितीचे राजकीय ऊस पर्यवेक्षक सुनील कुमार यांच्यावर ढिकौलीतील युद्धवीर सिंह यांच्यासह तीन अज्ञात व्यक्तींनी ऊस समितीत येऊन काही बाँड्सवर बनावट पद्धतीने ऊस क्षेत्र नोंदणीसाठी दबाव आणला. सुनील कुमार यांनी शासकीय नियमांविरुद्ध काम करण्यास मनाई केल्यानंतर युद्धवीर सिंह याच्यासह त्याच्या तीन अज्ञात व्यक्तींनी सुनील कुमार यांना शिवीगाळ व मारहाण केली. ठार मारण्याची धमकी देत शासकीय कागदपत्रे फाडून टाकल्याचे राज्याचे ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले.
या प्रकरणाची दखल घेत राज्याचे ऊस आयुक्त भुसरेड्डी यांनी बागपत जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दोषींविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे युद्धवीर सिंह, रा. ढिकौली याच्यासह तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादविस १८६० अधिनियमातील कलम ३२३, ३३२, ३३६, ४२७, ५०४, ५०६ अनुसार बागपत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोषी व्यक्तींचा बाँड बंद करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
ऊस विकास विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निर्भिडपणे काम करावे, कोणत्याही ऊस माफियाची लुडबूड चालू देणार नाही असा इशारा ऊस आयुक्तांनी दिला आहे.