नवी दिल्ली : चीनी मंडी
युरोप आणि पाश्चिमात्य देशांमध्ये ऊस शेती आणि साखर उद्योगात नव नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले जात आहे. हे नवीन तंत्रज्ञान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कसे फायद्याचे ठरू शकले, त्याचा अभ्यास करण्यासाठी एक शिष्टमंडळ युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यात साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असून, त्यांचे नेतृत्व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले.
या दौऱ्यात जागतिक पातळीवर साखर उद्योगात सुरू असलेले प्रयोग, साखर उत्पादनासाठी ऊस आणि बीट या व्यतिरिक्त असणारे पर्याय तसेच ग्रामीण भागात साखर उद्योगातून रोजगार निर्मिती कशी करता येईल, याचा अभ्यास करण्यात आला. त्याचबरोबर खरा झालेल्या जमिनीला पुन्हा वापरात कसे आणता येईल, याचीही माहिती घेतली जाणार होती.
आठ दिवसांच्या या दौऱ्यात बेल्जियम, फ्रान्स, स्पेन आणि नेदरलँड या चार देशांचा दौरा करण्यात आला. या चार देशांमधील संशोधन केंद्रे, संस्था, खासगी कंपन्या, सहकारी समित्या यांच्या कामाचा आढावा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.
या दौऱ्यात महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील, शिवाजीराव देशमुख, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, गणपतराव तिडके, नरेंद्र मुर्कंबी, युगेंद्र पवार, सतीश राऊत आदींचा समावेश होता.