कोल्हापूर : यंदा राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे ऊसाचे उत्पादन घटणार आहे. शेतकऱ्यांनी केवळ ऊस लवकर जातो म्हणून ऊस गाळपाला पाठवू नये. पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्याला गळीतास पाठवावा, असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. नंदगाव (ता. करवीर) येथे श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रमुख मार्गदर्शक संजीव माने म्हणाले, जादा उत्पादनासाठी रासायनिक खते आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमीनीची प्रत खालावत आहे. जमिनीत कायम वाफसा असणे गरजेचे आहे. त्यासाठी रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खतेही देणे आवश्यक आहे. यावेळी प्रतिक पाटील (इस्पुर्ली) यांची कृषी उपसंचालकपदी निवड झाल्याबद्दल तर विक्रम कुराडे (नंदगाव) याची जागतिक ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘शाहू’चे संचालक शिवाजी पाटील, भाऊसाहेब कांबळे, माजी संचालक मारुती निगवे, एम. आय. चौगुले, रुक्मीणी पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, सरपंच भगवान पाटील, रंगराव तोरस्कर, अनिल ढवण, अण्णाप्पा बोडके, दिंडनेर्लीच्या सरपंच मंगल कांबळे, बाळासो चौगुले, पांडुरंग नरके, जयवंत नरके, कृष्णात चव्हाण, डी. आर. पाटील, शाबाजी कुराडे, भीमराव चौगले, एकनाथ पाटील, संजय नाईक, मारुती झांबरे प्रमुख उपस्थित होते. संजय नरके यांनी स्वागत केले. राजकुमार तापेकर यांनी आभार मानले.