नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी आर्थिक वर्ष २०२२-२३ चे बजेट सादर केले. सलग दुसऱ्यांचा हे पेपरलेस बजेट आहे. देशात ६० हजार युवकांना नोकरी दिली जाईल. तर देशात वर्षभरात गरीबांसाठी ८० लाख घरे तयार केली जातील असेही त्या म्हणाल्या. डिजिटल करन्सी लाँच करण्याची घोषणा त्यांनी केली. अनेक वस्तूंवरील कस्टम ड्यूटी, आयात शुल्कासह काही कर वाढविण्यात आले आहेत. तर काही घटविण्यात आले.
एमएसएमई सेक्टरला मदतीसाठीची स्टील स्क्रॅपवरील कस्टम ड्यूटी सवलत एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. तर कट आणि पॉलिश्ड डायमंडसह जेम्स अँड ज्वेलरीवरील आयात शुल्क घटवून ५ टक्के केले आहे. सरकार ई कॉमर्स मधून आभूषणे निर्यात सुविधा देईल अशी घोषणाही सीतारमण यांनी बजेटमध्ये केली. स्टेनलेस स्टील, कोटेड स्टील, अलॉय स्टीलच्या काही भागांवर अँटी डंपिंग शुल्क, काऊटरवेलिंग कर हटविण्यात आला आहे. देशांतर्गत मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहनासाठी मोबाइल फोन, चार्जर, ट्रान्सफर आदींवरील आयात करात सूट दिली आहे.
या वस्तू झाल्या स्वस्त
कपडे, चामड्याच्या वस्तू, मोबाइल फोन, चार्जर, हिऱ्याचे दागिने, शेतीचे साहित्य, पॉलीश हिरे, विदेशी मशीने, इलेक्ट्रॉनिक साहित्य, फ्रोजन मसल्स, फ्रोजन स्क्विड, हिंग, कोको बीन्स, मिथाइल अल्कोहल, अॅसिटिक अॅसिड, सेल्युलर मोबाइल फोनचे कॅमेरा लेन्स.
या वस्तू महागल्या
छत्री, इमिटेशन ज्वेलरी, लाउडस्पीकर, हेडफोन, इअरफोन, स्मार्ट मीटर, सोलर सेल, सोलर मॉड्यूल, एक्स-रे मशीन, इलेक्ट्रानिक खेळण्यांचे पार्ट्स.