नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम 2025-26 साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये सरकारने वाढ केली आहे, जेणेकरून उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळावा. रेपसीड आणि मोहरीसाठी 300 रुपये प्रति क्विंटल आणि त्यापाठोपाठ मसूरसाठी 275 रुपये प्रति क्विंटल वाढ जाहीर केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ही माहिती दिली.
हरभरा, गहू, करडई आणि बार्लीसाठी अनुक्रमे 210 रुपये प्रति क्विंटल, 150 रुपये प्रति क्विंटल, 140 रुपये प्रति क्विंटल आणि 130 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे.विपणन हंगाम 2025-26 साठी अनिवार्य रब्बी पिकांसाठी MSP मध्ये वाढ अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर MSP निश्चित करण्याच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 च्या घोषणेनुसार आहे.रब्बी पिकांच्या या वाढलेल्या एमएसपीमुळे शेतकऱ्यांना फायदेशीर भाव मिळतील आणि पीक विविधतेला प्रोत्साहन मिळेल.