नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्याबाबत भूतान अन्न आणि औषध प्राधिकरण (BFDA), रॉयल गव्हर्नमेंट ऑफ भूतानचे आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यात करार करण्यास मान्यता देण्यात आली.
भूतानचे अन्न आणि औषध प्राधिकरण (BFDA), आरोग्य मंत्रालय, रॉयल गव्हर्नमेंट ऑफ भूतान आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्यात या करारावर स्वाक्षरी केल्याने दोन शेजारील देशांत व्यापार सुलभ होईल. भारतातून उत्पादने निर्यात करताना एफएसएसएआयने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्याचा पुरावा म्हणून बीएफडीए आरोग्य प्रमाणपत्र जारी करेल. यातून व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन मिळेल आणि दोन्ही घटकांच्या अनुपालनाचा खर्च कमी होईल.