आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये केवळ व्यावसायिक/ कॅप्टिव्ह खाणींमधून 186.63 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे उद्दिष्ट

केंद्रीय कोळसा मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशातील केवळ व्यावसायिक/ कॅप्टिव्ह (सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील) खाणींमधून 186.63 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये हे उत्पादन 225.69 दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यात येईल आणि केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या विद्यमान नियोजनानुसार, आर्थिक वर्ष 2029-30 पर्यंत अशा खाणींमधून होणारे कोळसा उत्पादन 383.56 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचलेले असेल.

मंत्रालयाकडून नुकत्याच(31 डिसेंबर 2023 रोजी उपलब्ध) हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील/ व्यावसायिक प्रकारच्या 50 खाणींमध्ये कोळसा उत्पादन सुरु आहे आणि त्यापैकी 32 खाणींतील कोळसा उर्जा क्षेत्रासाठी, 11 खाणींतील कोळसा बिगर-नियामकीय क्षेत्रासाठी तर 7 खाणींतील कोळसा विक्रीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष 2020 मध्ये व्यावसायिक कोळसा खाणींचे लिलाव सुरु झाल्यापासून साडेतीन वर्षांच्या काळात, 14.87 दशलक्ष टन कोळसा उत्पादनाच्या एकत्रित सर्वोच्च दराची क्षमता(पीआरसी) असलेल्या सहा खाणींमध्ये कोळसा उत्खननाला याआधीच सुरुवात झाली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील तसेच व्यावसायिक प्रकारच्या कोळसा खाणींमध्ये एकूण 14.04 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन झाले असून गेल्या वर्षी याच महिन्यात झालेल्या 10.14 दशलक्ष टन कोळसा उत्पादनापेक्षा हे उत्पादन 38%नी जास्त आहे.

सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील तसेच व्यावसायिक प्रकारच्या कोळसा खाणींमधील कोळसा उत्पादन आणि कोळशाची वाहतूक यामध्ये 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत लक्षणीय वाढ झाली आहे. सरकारी कंपन्यांच्या ताब्यातील तसेच व्यावसायिक प्रकारच्या कोळसा खाणींमध्ये 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत 98 दशलक्ष टन कोळसा उत्पादन झाले आहे.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here