नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना शुक्रवारी अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
गोयल सध्या एनडीएच्या नेतृत्त्वातील, सरकारचे रेल्वेमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून काम पाहत आहेत. रामविलास पासवान यांना गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि गुरुवारी सायंकाळी वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात होते आणि ते देशातील नामवंत नेत्यांपैकी एक होते. आपल्या दीर्घ राजकीय आयुष्यात त्यांनी नेहमीच गरीब, दलित आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी साखर उद्योगासह अनेक क्षेत्रात समृद्धी आणि विकासासाठी काम केले. आपल्या कारकीर्दीत साखर उद्योगासाठी त्यांनी बरेच चांगले निर्णय घेतले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.