केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राईस मिलर्ससाठी FCI तक्रार निवारण प्रणाली मोबाईल ऍप्लिकेशन केले लाँच

नवी दिल्ली : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीतील राईस मिलर्ससाठी तयार केलेल्या FCI तक्रार निवारण प्रणालीसाठी (FCI GRS) मोबाईल ऍप्लिकेशनचे अनावरण केले. हा उपक्रम पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भागधारकांचे समाधान वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. हे ऍप्लिकेशन राईस मिलर्सना त्यांच्या तक्रारी FCI कडे कार्यक्षमतेने आणि पारदर्शकपणे सोडवण्यास सक्षम करेल. FCI GRS ॲप हे उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सरकारच्या व्यापक धोरणाचा एक घटक आहे आणि Android वापरकर्त्यांसाठी Google Play Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

डिजिटल इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने, राईस मिलर्सना तक्रारी सबमिट करण्यासाठी, त्यांच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांच्या मोबाइल डिव्हाइसवर पूर्णत: डिजीटल पद्धतीने अद्यतने प्राप्त करण्यासाठी सुलभ व्यासपीठ प्रदान करून प्रतिसाद आणि जबाबदारी वाढविण्यासाठी ॲपची रचना केली गेली आहे. हा उपक्रम तक्रार निवारण यंत्रणेद्वारे उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि भागधारकांचे समाधान वाढविण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here