इथेनॉलच्या स्त्रोतांच्या वैविधतेवर लक्ष केंद्रीत करण्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्ली : पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी साखर उद्योगाने इथेनॉल उत्पादनाच्या स्रोतांमध्ये वैविध्य आणण्याचा सल्ला दिला आहे. सद्यस्थितीत ऊस हा भारतात इथेनॉल निर्मितीचा मुख्य स्त्रोत आहे. आणि ऊस हे जादा पाणी वापर करणारे पिक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतात सध्या एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता ९२३ कोटी लिटर आहे. यापैकी ६०५ कोटी लिटर साखरेवर आधारित तर ३१८ कोटी लिटर धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादन केले जाते. भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि द्वितीय क्रमांकाचा निर्यातदार देश आहे.

Society of Indian Automobile Manufacturers (SIAM) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मंत्री पुरी यांनी सांगितले की, मला नेहमी चिंता वाढते की जेव्हा लोक साखरेविषयी विचारणा करतात. इथेनॉलच्या स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. यामध्ये पिकांचे शिल्लक अवशेष, भाताचे पिंजर आदींचा समावेश आहे. कारण ऊस हे पाण्याचा भरपूर वापर करणारे पिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here