नवी दिल्ली: देशामध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. रोजच्या रोज कोरोनाची हजारो प्रकरणे समोर येत आहेत. तसेच कोरोना वायरसच्या विळख्यात शेकडो लोकांना जिव गमवावा लागत आहे. आता तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाखावर गेला आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने अनलॉक 3 ची तयारी जोरात सुरु केली आहे. शनिवारी गृह मंत्रालयाने अनलॉक 3 ची गाइडलाइन्स जाहीर केली आहे. पाहूया काय खुले राहणार आणि काय बंद राहणार.
हे राहणार खुले :
*योग संस्थान आणि जिम
*नाईट कर्फ्यू आता हटणार
*स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंग सह लोकांना सहभागी होण्याची मुभा
*कंटेनमेंट झोन्स मध्ये 31 ऑगस्ट पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी
*65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरीक, लहान मुले आणि गरोदर महिलांनी घरातच रहण्याचा सल्ला.
हे बंद राहील….
* कंटेनमेंट झोन्समध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकडाउन च्या नियमांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही.
* कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाउन लागू
* शाळा/ महाविद्यालये
* चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क
* मेट्रो ट्रेन
* सामाजिक समारंभात लोकांच्या अधिक संख्येवर प्रतिबंध
* धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा कोणत्याही मनोरंजनाशी निगडित आयोजनांवर प्रतिबंध जाहीर.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.