बागपत: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउन दरम्यान उत्तर प्रदेशामध्ये कारखान्यांचे कार्य सुरु आहे, ज्यामुळे ऊस शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता बागपत च्या डीएम शकुंतला गौतम यांनीदेखील शेतकर्यांना आश्वासन दिले आहे की, सर्व साखर कारखाने संपूर्ण ऊस गाळप होण्यापर्यंत चालतील. डीएम शकुंतला गौतम यांनी साखर कारखाना आणि ऊस विभागातील अधिक़ार्यांसह थकबाकीचे परीक्षण केले.
जिल्ह्यातील शेतकर्यांचे विविध साखर कारखान्यांकडून 866 करोड रुपये देय बाकी आहे. डीएम शकुंतला गौतम यांनी बलकपूर साखर कारखाना अधिकार्यांना ताबडतोब पैसे भागवण्याचे आदेश दिले आहेत. आणि हेदेखील सांगितले आहे की, पैसे न भागवल्यास कारवाई केली जाईल. शेतकर्यांना आश्वासन देताना डीएम म्हणाल्या , जोपर्यंत शेतात ऊस आहे, तोपर्यंत साखर कारखाना सुरु राहील. डीसीओ अनिल कुमार आणि इतर अधिक़ारी यावेळी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.