सहारनपूर : साखर कारखान्यांचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट जवळपास पूर्ण होण्याच्या स्थितीत आले आहे. तर बहुतांश कारखान्यांकडे गाळपासाठी खूप कमी ऊस शिल्लक राहिला आहे. शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळपास घेतल्यानंतरच कारखाने बंद केले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात यंदा १.२१ लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात येणार होता. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सहा कारखान्यांनी गाळप सुरू केले. तर ९ एप्रिल रोजी टोडरपूर कारखान्याचेही गाळप सुरू झाले. कारखाना चाचणीसाठी सरसावा कारखान्याकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. जिल्ह्यात ऊस गाळप सुरू होऊन साडेपाच महिने झाले आहेत. मात्र, कारखान्यांकडे अद्याप १८ टक्के ऊस शिल्लक आहे. गंगनोली कारखान्याने कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप झाल्यानंतर ३ एप्रिल रोजी हंगामाची समाप्ती केली. मात्र, इतर कारखाने गाळपात पिछाडीवर असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. उशीरा उसाची तोडणी झाल्यास आगामी हंगामात कमी उत्पादन मिळण्याची भीती त्यांना सतावत आहे.