महराजगंज : सिसवा येथील आयपीएल साखर कारखान्याने ९ एप्रिल २०२३ पर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी ७ कोटी रुपयांसह हंगामात एकूण ९६.६३ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली आहेत. साखर कारखान्याचे युनिट हेड आशुतोष अवस्थी, मुख्य व्यवस्थापक कर्मवीर सिंह यांनी ही माहिती दिली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सध्याच्या गळीत हंगामातील ९ एप्रिलपर्यंत खरेदी केलेल्या उसाचे सर्व पैसे देण्यात आले आहेत. कारखान्याने एकूण ९६ कोटी रुपयांची बिले दिली आहेत, असे युनिट हेड आशुतोष अवस्थी म्हणाले. तर मुख्य व्यवस्थापक कर्मवीर सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतांमध्ये उपस्थित राहून उसाचा सर्व्हे करावा. सध्या अतिशय कडक ऊन असून पाऊस नसल्याने उसावर किडींचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यामुळे कोराजनचा वापर करुन वेळेवर सिंचन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. कारखान्याच्या वतीने सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे.