शामली : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रावर दोन दिवसीय नैसर्गिक ऊस उत्पादन तंत्राच्या आव्हानांबाबत तसेच शक्यतांवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नैसर्गिक ऊस उत्पादनाच्या तंत्राबाबत, नव्या पद्धतीबाबत कृषी संशोधक डॉ. विकास कुमार मलिक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांना जीवामृत, अग्नियास्त्र, निमास्त्र, ब्रह्मास्त्र आदी तयार करण्याच्या पद्धतीची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी जसजीत कौर, उप जिल्हाधिकारी संतोष कुमार सिंह आदींनी नैसर्गिक ऊस तंत्राची पाहणी केली. त्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक पद्धतीबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी डॉ. ओंकार सिंह, डॉ. साकिब, काम्या सिंह तसेच कृषी विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी कृषी विज्ञान केंद्रावर विद्युतीकरणास प्रारंभ करण्यात आला.