युपी: थकीत ऊस बिलांचा आढावा घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमरोहा : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊस दर आणि वितरणासह आगामी २०२३-२४ च्या ऊस सर्वेक्षण बैठकीत जिल्हाधिकारी बी. के. त्रिपाठी यांनी आढावा घेण्यात आला. विभागवार सर्व साखर कारखाना प्रतिनिधींकडून माहिती सादर करण्यात आली. आतापर्यंत किती पैसे शेतकऱ्यांना अदा करण्यात आल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, १४ दिवसांच्या आत बिल देण्याचा नियमांचे पालन करण्यासह ऊस विकास अंशदानाचे वितरण लवकरात लवकर केले जावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोणत्याही कारखान्याने बिले थकीत ठेवू नयेत. जर कोणतीही अडचण असेल तर उच्च स्तरावर निर्गत करावी असे ते म्हणाले. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये ऊस बिले तसेच अंशदानाचा आढावा घेतल्यावर एकूण देय ऊस बिलांच्या १४३३.७९ कोटी रुपयांच्या तुलनेत १२६२.९३ कोटी रुपये म्हणजे जवळपास ८८ टक्के बिले देण्यात आली आहेत. ऊस विकास अंशदान रुपये २५.१३ कोटी रुपयांच्या तुलनेत १६.८९ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. यादरम्यान जिल्हा ऊस अधिकारी मनोज कुमार यांच्यासह सर्व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here