लखनौ : जिल्ह्यातील १६ ऊस विकास समित्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना आता उच्च वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. १२ ऊस समित्यांमध्ये सातवा वेतन आयोग आणि चार समित्यांमध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सहकारी ऊस समित्यांचे निबंधक संजय भुसरेड्डी यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, निबंधकांनी सांगितले की, यापूर्वी ७७ सहकारी ऊस समित्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय झाला होता. आता इतर बारा समित्यांमध्ये सातवा वेतन आयोग लागू होईल. त्यामुळे ८९ सहकारी समित्यांमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या श्रेणीचा लाभ मिळेल.
ते म्हणाले की, सहकारी ऊस समित्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे, या उद्देशाने सक्षम असलेल्या ऊस समित्यांमध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.