शामली : पुर्ण येथील शेतकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केले. शामली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय विदारक असल्याचे शेतकऱ्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांची सर्व ऊस बिले त्वरित देण्यात यावी. जर एखाद्या कारखान्याला पैसे देणे शक्य नसल्यास त्यांनी शेतकऱ्यांना त्या किमतीची साखर द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार संघटनेने केली आहे. थानाभवन येथील बजाज साखर कारखान्याने आता १० दिवसांची बिले दिली आहेत. थानाभवन कारखान्याकडे जवळपास ३५८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. हे पैसे तातडीने मिळावेत. जर पैसे मिळाले नाहीत तर ३० एप्रिल रोजी आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाल सिंह पुंडीर, शहजाद, खलील, नरेश सिंह तोमर, नरेंद्र सिंह, मुस्तकीम, सोनू कुमार आदी उपस्थित होते.