उत्तर प्रदेश सरकारचा इथेनॉल क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर

लखनौ : इथेनॉलचा वापर जीवाश्म इंधनासह मिश्रणाशिवाय औषधे, रसायने आणि मद्यासह विविध औद्योगिक प्रक्रियेत केला जातो. इंधनासोबत मिश्रणासाठी इथेनॉल उत्पादनात वाढीमुळे राज्यातील ऊस उत्पादकांना वेळेवर आणि लाभदायी दर मिळण्यास मदत होत आहे. इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याने केंद्र सरकारला आपली पेट्रोलियम आयात कमी करण्यासही मदत मिळणार आहे. राज्यात कृषी उत्पन्न वाढवणे, रोजगार निर्मिती करण्यासाठी इथेनॉल क्षेत्रात गुंतवणूक करण्यावर भर देण्यात येत आहे.

द पायोनिअरमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मद्य व्यापारापासून उत्पादन शुल्क महसुलाशिवाय, राज्य सरकार इथेनॉल उत्पादनापासून आपल्या करात अधिक वाढ करण्याचा विचार करीत आहे. उत्तर प्रदेश भारताचे अग्रेसर इथेनॉल उत्पादक राज्य आहे. अवैध मद्य आणि शेजारील राज्यांतून मद्य तस्करीविरोधात कठोर अभियानानंतर, उत्तर प्रदेश सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५८,००० कोटी रुपांचे उत्पादन शु्ल्क मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट २०२२-२३ मध्ये मिळालेल्या ४१,२५० कोटी रुपयांपेक्षा ४० टक्के अधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here